Quality Smart Course is Integrated B. Ed.
शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचे प्रकटीकरण अशी व्याख्या केली जाते, पण आज या २१ व्या शतकात या व्याख्येत बदल करावा लागेल तो म्हणजे शिक्षण हे केवळ सुप्त गुणांचे प्रकटीकरण नव्हे तर कौशल्यांचे व क्षमतांचे विकसन होय. शिक्षक शिक्षण हि अशी विद्याशाखा आहे जी विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक घडवते. हल्ली वर्तमान पात्रात आपण वारंवार वाचतो कि, एक वर्षाच्या कालावधीत उत्कृष्ठ शिक्षक घडू शकत नाही, म्हणून बी. एड. हे दोन वर्षाचे असावे, परंतु आजच्या पिढीच्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा व कौशल्याचा विकास करता फक्त २ वर्ष कालावधीत तयार होणारे शिक्षक चालणार नाही तर अधिक कालावधीत प्रशिक्षण पूर्ण करण्याचा व आजच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या क्षमता पूर्ण करणारे उत्कृष्ठ शिक्षकांची नितांत आवश्यकता आहे. बी.ए.बी.एड. व बी.एस्सी.बी.एड. चार वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम हा आजच्या विद्यार्थ्यांच्या सर्व अंगाचे विकसन करणारा आहे. ह्या आभ्यासक्रमाची वैशिष्ट्य खालील प्रमाणे सांगता येतील.
* चार वर्षात एकाच वेळेला दोन पदवीप्राप्त बी.ए. आणि बी.एड.
* एक मौल्यवान वर्षाची बचत.
* सैद्धांतिक आणि प्रालक्षिक कामाची व्यवस्थित चार वर्षात विभागणी.
* ह्या अभ्यासक्रमाच्या फी चा एकदम भार येण्याऐवजी चार वर्षात विभागणी.
* पदवी शिक्षणाबरोबरच एक व्यवसायिक अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्णसंधी केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर न देता शिक्षकी कौशल्य व क्षमता विकसनावर भर.
* चार वर्षांत शिक्षकी पेशास आवश्यक असलेल्या मूल्यांची रुजवणूक व त्याच्या उपयोगितेवर भर.
* उच्च नामांकित इंग्रजी/मराठी माध्यमांच्या शाळेत नोकरीची हमी १००%.
* जीवन कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रमामुळे आत्मविश्वास, संवादकौशल्य, निर्णयक्षमता, नेतृत्वक्षमता, सामाजिक कौशल्य, व्यक्तिमहत्व विकास इ. कौशल्यांची विकसन.
ह्या आभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये आभ्यासलास लक्षात येते कि, परिपूर्ण, उत्कृष्ठ, गुणवत्ताधिष्ठित, कौशल्याधिष्ठित शिक्षक तयार करणारा हा बी.ए.बी.एड. व बी.एस्सी.बी.एड. अभ्रासक्रम आहे. तरी देखील असा अभ्यासक्रम राबवणाऱ्या महाविद्यालयांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत हा एकात्मिक बी.एड. अभ्यासक्रम राबवणारे केवळ तीन महाविद्यालये आहेत तर नाशिक शहरात फक्त एक महाविद्यालय हा अभ्यासक्रम राबवते ते म्हणजे अशोका एज्युकेशन फाऊंडेशनचे अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालय. ह्या महाविद्यालयात २००९ पासून हा अभ्यासक्रम सुरु असून आजपर्यंत अनेक कौशल्यपूर्ण शिक्षक हे नाशिकमधील व नाशिकबाहेरील शहरात उच्च नामांकित शाळेत कार्यरत आहेत. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत परिपूर्ण क्षमता व कौशले विकसित, तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षक तयार करणे हे अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे धेय्य आहे. आजचा समाज आणि विद्यार्थी हा स्मार्ट आहे म्हणूनच अशा स्मार्ट विद्यार्थ्यांना शिक्षकही स्मार्टच आला पाहिजे अशा स्मार्ट शिक्षकाला घडवणऱ्या बी.ए./बी.एस्सी.बी.एड.एकात्मिक अभ्यासक्रम हा देखील स्मार्ट असून त्याला दुसरा पर्याय आज आणि अनेक दशकात उपलब्ध होऊ शकणार नाही.

Comments
Post a Comment